Saturday, March 15, 2014

होळीच्या आणि धुलीवंदन सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!



होळी महात्म कथा - होळी म्हणजे वाईट विचारांचे दहन - Happy Holi Story & Importance..

पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली.

विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला.

थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल.

होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

महाराष्ट्रात देखील होळी उत्सव आंनदाने, उत्साहाने साजरे करतात. आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमविल्या जातात. काही ठिकाणी ही लाकडे चोरूनही आणली जातात. त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात. सर्वजण झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते, नंतर तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते. त्याच्यावर गवत, वाळलेली लाकडे, गवर्‍या, केळी, इतर फळे रचले जातात. मुहूर्तावर होळीचे पूजन करून मुख्यत: पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. नंतर होळीचे दहन केले जाते. दहन करताना 'होळी रे होळी पुरणाची पोळी...' अशी घोषणाबाजी केली जाते.

अशी हि होळी सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो ..
सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!





मिळू द्या उत्सहाची सात
होऊ द्या रंगांची बरसात
होळी आली नटून सवरून
करू तीचे स्वागत जोश्यात

भरू पिचाकरीत रंग
बेभान करेल ती भांग
जो तो भिजण्यात दंग
रंगू दे प्रेमाची ही जंग

मिळू द्या उत्सहाची सात
घेऊ हातात आपण हात

रंगाच्या ह्या त्यव्हारात
अखंड बुडू या रंगात
बघा आली ती टोळी
घेऊन रंगांची ती पिचकारी

मारा फुगे , उधळा रंग
होऊ या आपण ही दंग
हसत खेळत अशीच साजरी करू
परंपरा आपली ही मराठ मोळी

म्हणा एका जोश्यात एकदा
होळी रे होळी , आली स्पंदनची टोळी

वाचणा~याच्या तोंडात पुरणाची पोळी..!

















_______________________________________________

माझ्या लहानपणी या संकासूराला पाहून मी खूप घाबरायचो.. :'(
खरंच किती सुंदर आणि गंमतीदार होते ते दिवस... ;)
_____________________________________________________



ससा रे ससा..
दिसतो कसा...?

ससा रे ससा..
दिसतो कसा..?

.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

खड्ड्यात गेला तो ससा

होळी आली...
चला आधी प्यायला बसा :p :D


माझ्या सर्व शरीफ आणि बेवड्या मित्रांना होळीच्या शुभेच्छा..!                    -आकाश

No comments:

Post a Comment